सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरलं!

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

सारंग अरुण लखानी हे नागपूरस्थित विश्वराज ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक आहेत. ही कंपनी जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत असून गेल्या 20 वर्षांपासून देशभरात विविध प्रकल्प राबवत आहे.

सारंग लखानी यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित Columbia Business School मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं असून उद्योगक्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील हा आनंदाचा क्षण असल्यामुळे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली. विश्वराज ग्रुपचे संचालक सारंग लखानी यांच्याबद्दल सविस्तर माहिती वाचा.